dr.satish best web design developer for mac

कडगांव ग्रामपंचायत :

कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यापासून अगदी चार किलोमीटर अंतरावर कडगांव हे गाव वसले आहे. या गावाचे ग्रामदैवत जोतिर्लिंग या देवाचे गावात भव्य असे मंदिर उभारण्यात आले आहे. ग्रामपंचायतीमार्फत गावातील लोकांना वेगवेगळ्या योजनांची माहिती देवून त्या योजनांचा लाभ घेण्याचे सांगितले जाते. तसेच गावाला सन 1998-99 मध्ये ग्राम अभियानामध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल कोल्हापूर जिल्ह्यात व्दितीय क्रमांकाचे बक्षीस मिळाले. याचबरोबर ग्रामपंचायतीमार्फत ग्रामस्‍वच्‍छता, वृक्ष लागवड, पाणीपुरवठा जन्‍म-मृत्‍यु नोंद, विवाह नोंद इ. कार्य केली जातात. ग्रामपंचायती मार्फत ऑनलाईन ग्रामीण सुविधा दिल्‍या जातात.

ग्रामपंचायत कार्यप्रणाली :

कडगांव ग्रामपंचायत ही 1939 सालापासून  कार्यरत असून सदस्य संख्या तेरा आहे. सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने ग्रामपंचायतीचा कारभार पाहिला जातो. आमच्या गावातील कुटुंबांची संख्या 1,310 असून गावाची लोकसंख्या 5,810 इतकी आहे. तसेच ती 5  वॅार्ड मध्ये विभागली गेली आहे.

सरपंच
सौ. सिमा रमेश गोंधळी

गावाला रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण इ. पायाभूत सुविधा देऊन गावाचा विकास करण्यासाठी मी प्रयत्न करते.

उपसरपंच
श्री. नवज्योत बाळासो देसाई

गावातील लोकांमध्ये बंधू भाव निर्माण करुन आपल्या गावाचा विकास करण्यासाठी माझा प्रयत्न असतो.

ग्रामसेवक
श्री. कृष्णा तुकाराम सिताप

गावामध्ये सुव्यवस्था राखणे, विविध सरकारी योजनांबद्दल माहिती देण्याचा माझा प्रयत्न असतो.

आपली समस्या,विचार व विकास मांडा.

आम्ही 'ज्ञानग्रुप' आपली समस्या किंवा विचार थेट जिल्हा परिषद कोल्हापूर पर्यंत पोचवु...!

Gadhinglaj City- Kolhapur Maharashtra

ADDRESS
Kadgaon Grampanchayat
A/p Kadgaon Tal- Gadhinglaj Dist- Kolhapur
416502

CONTACTS
Phone : 9881938585

Office : 02327 – 278183